वाढत्या विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविषयक तज्ज्ञ समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केल्यावर निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातला आदेश रात्री उशिरा जारी करण्यात आला.

राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचं वाढतं प्रमाण आणि ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग यामुळे पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविषयक तज्ज्ञ समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केल्यावर निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातला आदेश रात्री उशिरा जारी करण्यात आला.

हे सर्व निर्बंध आज मध्यरात्रीपासून लागू होतील. खुल्या मैदान किंवा बंदिस्त सभागृहातल्या विवाह सोहळ्यांमध्ये केवळ ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी असेल. सर्वच राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांत फक्त ५० लोकांनाच सहभागी होण्यास परवानगी असेल, तसंच अंत्यविधीसाठी २० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढणाऱ्या जिल्हे किंवा महापालिका हद्दीत निर्बंध कठोर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला बहाल करण्यात आले आहेत.

मावळत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी मुंबईसह विविध शहरे किंवा पर्यटनस्थळी चौपाट्या किंवा समुद्रकिनाऱ्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता या सर्व चौपाट्या बंद केल्या जाणार आहेत. सर्व पर्यटनस्थळांवर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. दरम्यान, राज्य कृती दलाच्या या बैठकीत रुग्णसंख्या वाढत असल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. गर्दी नको या मुद्यांवर सर्वांचं एकमत असून, आणखी निर्बंधाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं

सोशल मीडिया पर अपडेट्स के लिए Facebook (https://www.facebook.com/industrialpunch) एवं Twitter (https://twitter.com/IndustrialPunchपर Follow करें …

  • Website Designing